Posts

Showing posts from September, 2022

क्रांतीकारक शहीद भगत सिंग यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🌹🌹

Image
शहिदे आझम भगतसिंग  जन्म :  28 सप्टेंबर 1907     (ल्यालपूर, पंजाब, भारत)        फाशी : 23 मार्च 1931 (लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत) टोपणनाव : भागनवाला चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: नौजवान भारत सभा,             कीर्ती किसान पार्टी,             हिंदुस्तान सोशालिस्ट                  रिपब्लिकन असोसिएशन पत्रकारिता/ लेखन: अकाली,                अनुवाद, 'मेरा आयरिश                     स्वतंत्रता संग्राम' धर्म: नास्तिक प्रभाव: समाजवाद, कम्युनिस्ट प्रभावित: चंद्रशेखर आझाद वडील: सरदार किशनसिंग संधू आई: विद्यावती             भगतसिंग  एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श...

खुश खबर पी एच. डी विद्या वेतन मध्ये वाढ

Image
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 'पीएच.डी.' उमेदवारांना आता नोंदणी दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी ३१ हजार रुपये, घरभाडे, आकस्मिक खर्च दिला जाणार आहे. तर 'यूपीएससी'ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे मासिक विद्यावेतन दहा हजारांवरून तेरा हजार करण्यात आले आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ नागपूर येथे ‘महाज्योती'च्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यात आला. वित्त विभागाकडे यासंदर्भात अधिक निधीची मागणी करण्याचे संकेत यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले..

राज्यात लवकरच होणार पोलीस मोठी भरती गृह मंत्रालयाचा 👍

Image
गृहमंत्रालयाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. 8 हजार पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून लवकरच आणखी 12 हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील लाखो तरुणी,तरुण पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहे . काही दिवसांपूर्वी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना नांदेड येथे तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. सरकारने तातडीने रिक्त पदांची भरती करावी, आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.

गाव अलवाडी येथे गुरावर लँम्पी आजाराची निशुल्क लसीकरण

Image
अलवाडी  येथे लँम्पीआजाराची निशुल्क लसीकरण अलवाडी ता चाळीसगाव येथे महाराष्ट्र शासनाकडून लँम्पीआजाराची निशुल्क लसीकरण करण्यात आले डॉ. दत्ता जाधव, भाऊसाहेब पाटील. यांचे सहकार्य लसीकरण ला लाभले.ग्रामसेवक A R माळी , सरपंच प्रशांत पाटील उपसरपंच, ग्रामपंचायत सदयस ,सेवक यांनी ही गावातील शेतकऱ्यांना लसीकरण करून घावें असे आवाहन केले तसेच लसीकरणा ला सहभाग लाभला, पशुधन बाबत सगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या पशुधनाच्या लसीकरणासाठी आहे त्या ठिकाणी जागेवर जाऊन लसीकरण करण्यात आले, गावात एकूण चारशे  लसीकरण करण्यात आले असून त्यामुळे लंपी आजारापासून जनावरांना संरक्षण मिळाले आहे. 

Css Corp Pvt Ltd Campus

Image
CSS Corp Pvt Ltd Campus recruitment drive (2023 passout candidates) for Job Role -"Technical Service Desk Engineer" Interested and eligible candidates may register with this link : https://lnkd.in/dbD9edK5 Eligibility: B.E/B.Tech [CSE, ECE, EEE, IT/IS] From 2023 batch with 60% and above in highest qualification No backlogs/No standing arrear Salary: INR 2,50,000 Per Annum + Night shift allowance Work Location: Chennai, Bangalore, Hyderabad

तालुकास्तरीय स्पर्धेत सारताळे आश्रमशाळेचे यश

Image
तालुकास्तरीय स्पर्धेत सारताळे आश्रमशाळेचे यश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा शासकीय आश्रमशाळा रामेश्वर येथे पार पडल्या. स्पर्धेसाठी १७ आश्रमशाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वैयक्तिक क्रीडाप्रकारात वयोगट १९ वर्षे ४०० मी. धावणे स्पर्धेत मंगलदास अशोक माळी व ८०० मी. धावणेमध्ये अमोल सुभाष पोकळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला व हरणबारी येथे पार पडणाऱ्या प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच सांघिक क्रीडाप्रकारात वयोगट १९ वर्षे खो-खो मुले या स्पर्धेत आमोदे आश्रमशाळेला अंतिम फेरीत नमवून प्रकल्पाला निवड झाली. हॅण्डबॉल १७ व १९ वर्षे वयोगट या क्रीडाप्रकारात उत्तम खेळ दाखवत नरूळ व गोपाल खडी यांच्याविरुद्ध जिंकून प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडाशिक्षक बाळू राठोड, भूषण बोरसे, धीरज परमार, नितेंद्र सोळुंके, सुहास पाटील व यशस्वी विद्यार्थ्याचे ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस रमेश पगार, कोषाध्यक्ष नम्रता पगार, प्राचार्य आर. आर. भामरे यांनी अभिनंदन केले.

पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे 👍

Image
 कागदपत्रे तयार आहे का ? पोलिस भरती प्रकिया डिसेंबर 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे म्हणुन पोलिस भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तयार ठेवावी.. १) १० वी गुणपत्रक आणि १० बोर्ड प्रमाण पत्र. २) १२ वी गुणपत्रक आणि १२ बोर्ड प्रमाण पत्र. ३) पदवी असल्यास प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष / गुणपत्रक. ४) पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / गुणपत्रक. ५) डिप्लोमा असल्यास त्याचे गुणपत्रक. ६) MS-CIT किंवा CCC (संगणक परीक्षा) प्रमाणपत्र. ७) टंकलेखन असल्यास शासनमान्य प्रमाणपत्र. ८) वय व अधिवास प्रमाणपत्र. ९) जातीचे प्रमाणपत्र. १०) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध पाहिजे) ११) आर्थिक दृष्ट्या घटकाचे प्रवर्गासाठी प्रमाणपत्र (EWS). १२) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० % आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र. १३) दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र. १४) NCC कॅडेट असल्यास A B C पैकी कोणतेही प्रमाणपत्र. १५) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र. १६) पोलीस पाल्य प्रमाणपत्र (उमेदवार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या खालच्या पोलीस पदावरील कर्मचान्यांचा मुलगा / म...

माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवे अध्यक्ष

Image
माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवे अध्यक्ष  🔸भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याची हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भारताचा माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू दिलीप तिर्कीची आज हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तिर्कीची ही निवड बिनविरोध झाली आहे हे विशेष. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदसाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी आपले नामांकन मागे घेतल्यानंतर दिलीप तिर्कीचा हॉकी इंडियाचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला.

जळगांव जिल्ह्यात येल्लो ( Yellow )अलर्ट

Image
A  विषय :- जिल्ह्यात यलो अलर्ट मुळे पावसाची शक्यता व धरणाची पाणीपातळी वाढण्याच्या शक्यतेमुळे दक्षता घेणेबाबत. संदर्भ :- भारतीय हवामान खाते यांनी दिनांक 18/09/2022 रोजी दक्षता घेणेबाबत दिलेल्या इशान्यानुसार. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविणेत येते की, पुढील आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवलेली असल्याने तसेच दिनांक 19/09/2022 ते दिनांक 23/09/2022 रोजी ताशी 30 ते 40 किलोमिटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडुन प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असुन नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा 100% पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे सर्व लहान व मोठे घरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात यावा. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची सुचना द्यावी. बाज...

लिंपी या रोगांच्या प्रतिबंधक उपाय योजनासाठी जिल्हा अधिकारी यांनी दिले आदेश

Image
प्रति,गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व..... विषय :- गोवर्गिय जनावरांमधील लंपी या संसर्गजन्य आजारावर नियंत्रणाकामी प्रति ग्रामपंचायत रु. १००००/- इतकी तरतूद ग्रामपंचायत फंडातून उपलब्ध करुन देणेबाबत. संदर्भ: म. आयुक्त पशुसंवर्धन म.रा. आंध पूर्ण ६७ यांचे पत्र जा. क्र. रोनि / एलएसडी / २६/४९९९ / २०२० पर्स १२, पुणे, दि.०३/०८/२०२१ उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सध्या जळगाव जिल्हयात रावेर तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. यात गावामधील बात जनावरांचे नमुने जमा करण्यात आले असून ते रोग अन्वेषण विभाग पुणे येथे निश्चित निदानासाठी पाठवण्यात आलेले आहे. सदर आजारासाठी नमूने पांझीटीव्ह येण्याची शक्यता आहे. सदर आजाराचा फैलाव हा गोचीड-गोमाशा यांच्या चाव्याने होतो. उर्वरीत तालुक्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तव सदर आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शक्यतो पुर्ण गावात एकाच दिवशी मोहीम स्वरुपात गावातील जनावरे व जनावरांचे गोठे यामध्ये गोचिड-गीमाशा निर्मूलन करणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत फंड...

MSF अंतिम यादी व निवड झालेल्या उमेदवारांसाठी

Image
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक (कंत्राटी) अंतिम निवड व प्रतिक्षाधीन यादी (नामिका सूची) 2020 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा मार्फत 7000 पुरुष सुरक्षा रक्षकांची (कंत्राटी) प्रतीक्षाधीन यादी 2020 च्या जाहिरातीनुसार दि. 20/08/2022 ते दि. 05/09/2022 दरम्यान रारापोबल गट क्र. 1, 3, 4, 5, 7, 9, 11 व 14 या भरती केंद्रावरती भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना भरती प्रक्रियेतील निकष चाचणीनुसार मिळालेल्या गुणांची एकत्रित माहीती ही यापूर्वी उपलब्धतेनुसार मरासुम च्या संकेत स्थळावरती प्रसिध्द करण्यात आली होती. नमुद भरती प्रक्रिया कार्यपध्दतीतील निदेशानुसार फेर पडताळणी करुन तसेच प्राप्त झालेले आक्षेप, हरकतीची पुर्तता करुन महामंडळाच्या निवड समितीच्या मान्यतेने अंतीम गुणवत्ता निवड यादी व प्रतिक्षाधीन (नामिका सुची यादी) खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. अंतिम गुणवत्ता यादी व प्रतिक्षाधीन (नामिका सुची) यादीतील उमेदवारांनी जाहिराती मधील महत्वाच्या सुचना व अटींच्या अनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे तसेच कोणती वस्तुस्थिती निदर्श...

आपण निवडणूक ओळखपत्र व आधार ला जोडणी केली आहे का ?

Image
आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे‼️ ‼️खालील प्रक्रिया‼️ FOLLOW करा 1.voter helpline हे app डाऊनलोड करा 2.voter registration ला क्लिक करा 3.फॉर्म 6 b ला क्लिक करा 4.Lets start ला क्लिक करा 5.आपला मोबाईल नंबर टाका 6.आपल्याला otp येईल तो टाका 7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा 8.voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा 9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा 10.नंतर proceed क्लिक करा 11.आता तुमचा आधार नंबर टाका 12.Done करा व confirm ला क्लिक करा. तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल. वरील प्रमाणे सर्व नागरिकांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत. सेवा करण्याची संधी द्या...‼️🙏🏻🔸महत्वाचे🔸  मतदारांना मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी अर्ज क्रमांक 6ब तयार करण्यात आला आहे‼️ हा अर्ज खाली दिलेल्या संकेतस्थळावर आणि Voter Helpline App वर उपलब्ध आहे, संकेतसथळाला भेट देऊन मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड क्रमांक लिंक करावे‼️ ✅ National Voters Services Portal Link : https://nvsp.in/ ✅ Voter Portal Link : h...

गिरणा धरणतुन पाणी विसर्गाला सुरुवात

Image
मालेगाव जि नाशिक आज दि. 12/09/2022 रोजी सकाळी 9.00 वाजता गिरणा धरणाचे वक्रद्वार क्रमांक 2 व 5 हे प्रतेकी 1 फूटने आलेले आहे. सध्यस्थितीत धरणाचे 4 वक्रद्वार 1 फुटाने उघडे असून त्याद्वारे गिरणा नदीपात्रात एकूण 4888 Cusecs (138.41 Cumecs) पाण्याच्या विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.(विसर्ग वाढविण्यात आलेला आहे.) धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, आपले गुरेढोरे नदीकिनारी बांधू नये तसेच नदी मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये गिरणा पाट बंधारे यांनी व जिल्हा प्रशासक यांनी विनंती करण्यात येत आहे 

अग्निवीर १३ नोव्हेंबरला परीक्षा

Image
अग्निवीर भरतीसाठी १३ नोव्हेंबरला परीक्षा अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी १३ नाव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १३ ते ३० ऑगस्ट दरम्यान ७ जिल्ह्यातील ८६ हजार उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. यात पात्र झालेल्या उमेदवारांना छावणी परिसरातील चीफ रिक्रुटमेंट ऑफिसर (सीआरओ) यांच्या मार्गदर्शनात घेतली जाणार आहे. परीक्षेची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्यावेळी सूचना मिळले त्यावेळी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली 

वीर भगतसिंग परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी इंजि भूषण सूर्यवंशी यांची निवड

Image
गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.भुषण सुर्यवंशी सरांची कार्याध्यक्ष पदी निवड मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेच्या प्रदेश कार्यकारणीत राज्यस्तरीय युवाशक्ती पुरस्कार प्राप्त असलेले   इंजि.शिवश्री भुषण सुर्यवंशी "यांना राज्यात नाशिक विभागात जळगाव,धुळे,नंदुरबार,नाशिक व नगर जिल्ह्यात मोठी जबाबदारी ; थेट उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवडप रीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.सुदर्शन तारख आहेत.तर महाराष्ट्र प्रवक्ते सह प्रभारी पंकज रणदिवे यांच्या हस्ते ही निवड झाली.मागील दोन वर्षांपूर्वी  सुर्यवंशी यांना सचिव पदाचा पदभार देण्यात आला होता.या काळात जळगाव जिल्ह्यात संघटना बळकट केली. तसेच नवीन कार्यकारिणी नेमून कामाला गती दिली.गरजु मुलांना सवलतीच्या दरात अभ्यासिका व पुस्तके मिळवुन दिले.तसेच कोरोना काळात पदवीच्या अंतिम वर्षाला सरसकट पासची मागणी केली,जिल्हाबंदीत अडकलेल्या विद्यार्थींना मदत कक्ष,व खोली भाडे व परीक्षा शुल्क माफीसाठी निवेदने दिली.असे विविध आंदोलने, मेळावे,मोर्चे या द्वारे स्पर्धा परीक्षा चळवळीतील परीक्षार्थी,युवक,विद्यार्थी शिक्षक, पदवीधरांचे प्रश्...

शेतकरी पुत्र आमदार मंगेश चव्हाण यांनी विज कोसळलीं न्हावे गावाला दिली भेट..

Image
गाव न्हावे तालुका चाळीसगाव जि जळगांव येथे गावावर पसरली शोककळा आहे. काल दि 9/9/2022 रोजी न्हावे येथील शेतकरी आबा शिवाजी चव्हाण हे सकाळी शेतात गेले.आपल्या कुटुंबासह शेतात काम करत असताना दुपारी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात आबा चव्हाण यांच्यासह त्यांचा अल्पवयीन मुलगा विकी आबा चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला.अतिशय दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती प्राप्त होताच तात्काळ घटनास्थळी जाऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी पाहणी केली व दुःखाचा डोंगर कोसळलेल्या चव्हाण परिवाराचे व न्हावे ग्रामस्थांचे सांत्वन केले. सदर परिवारावर आलेले संकट हे कुठल्याही आर्थिक मदतीने किंवा सांत्वनाने भरून निघणार नाही इतके मोठे आहे मात्र अश्या काळात आपण सर्वांनी या कुटुंबाच्या पाठीशी राहू त्यांना आधार दिला. सदर कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या.यानिमित्ताने सर्व चाळीसगाव वासीयांना विनंती केली निसर्गचक्र खूप बदलत असून कधी आणि किती मोठा पाऊस पडेल, वादळ येईल याची अनिश्चितता झाली आहे. पुढील ४ दिवस उत्तर महाराष्ट्रात मुसळदार पावसाचा अंदाज असल्याने आपण सर्वानी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे त...

सुवर्णसंधी शेतकऱ्यांच्या शेतातळी साठी 👍

Image
 शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन जळगाव, दि. 7 - शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळ्याचे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना तसेच सामूहिक शेततळ्यासाठी असलेल्या योजनांचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर सिंचन सुविधा घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. ***