तालुकास्तरीय स्पर्धेत सारताळे आश्रमशाळेचे यश
तालुकास्तरीय स्पर्धेत सारताळे आश्रमशाळेचे यश
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा शासकीय आश्रमशाळा रामेश्वर येथे पार पडल्या. स्पर्धेसाठी १७ आश्रमशाळांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वैयक्तिक क्रीडाप्रकारात वयोगट १९ वर्षे ४०० मी. धावणे स्पर्धेत मंगलदास अशोक माळी व ८०० मी. धावणेमध्ये अमोल सुभाष पोकळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला व हरणबारी येथे पार पडणाऱ्या प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच सांघिक क्रीडाप्रकारात वयोगट १९ वर्षे खो-खो मुले या स्पर्धेत आमोदे आश्रमशाळेला अंतिम फेरीत नमवून प्रकल्पाला निवड झाली. हॅण्डबॉल १७ व १९ वर्षे वयोगट या क्रीडाप्रकारात उत्तम खेळ दाखवत नरूळ व गोपाल खडी यांच्याविरुद्ध जिंकून प्रकल्पस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडाशिक्षक बाळू राठोड, भूषण बोरसे, धीरज परमार, नितेंद्र सोळुंके, सुहास पाटील व यशस्वी विद्यार्थ्याचे ग्रामीण विकास संस्थेचे सरचिटणीस रमेश पगार, कोषाध्यक्ष नम्रता पगार, प्राचार्य आर. आर. भामरे यांनी अभिनंदन केले.
.jpeg)
Comments
Post a Comment