मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ची जलसंधारणासाठी एक जलनीती 👍

 मिशन 500 कोटी लिटर जलसाठा कामाचा शुभारंभ करतांना 

आपल्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर ९७ टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने व्यापला आहे आणि राहिलेला ३ टक्के भाग हा गोड्या पाण्याचा आहे आणि आपण गोडे पाणी हे पिण्यासाठी आणि आपल्या इतर वापरासाठी वापरले जाते. आपण खारे पाणी पिण्यासाठी किंवा कोणत्याही इतर वापरासाठी वापरू शकत नाही आणि म्हणून च पृथ्वीवर असणाऱ्या ३ टक्के पाण्याचा साठा हा आपण जपून वापरला पाहिजे जलसंधारण केले पाहिजे. पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधनांपैकी एक म्हणजे पाणी.मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे. कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे.कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे.पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्या लोक पाण्याचा खूप अपव्यय करत आहेत आणि पाण्याचा कसाही वापर करत आहेत पण पृथ्वीवरील गोड्या पाण्याची पातळी पाहून आपण पाण्याची बचत केली पाहिजे नाहीतर आपल्याला काही दिवसामध्ये आणि भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागेल म्हणनू जलसंधारण म्हणजे पाण्याची बचत आणि व्यवस्थापन केले पाहिजे.पाणी हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि अमूल्य ठेवा पाणी हे कोणत्या प्रयोग शाळेत आपण तयार करू शकत नाही केले तरी ती बाब फार खर्चिक आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणूनच पाण्याचे महत्त्व  आपण समजून घेतले पाहिजे. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन महत्त्वाचे आहे. जर पाण्याचे संवर्धन केले नाही तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपली पृथ्वी कोरडी पडू लागेल आणि पृथ्वीवर जगणे आव्हानात्मक होईल.

पाणी क्षेत्रात देशाचे जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थान मध्ये मोठे काम केले आहे. त्याचा च आदर्श घेऊन चाळीसगाव तालुका चे सुपुत्र डॉ उज्वल कुमार चव्हाण अप्पर आयुक्त आयकर विभाग मुंबई. याचे संकल्पनेने मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा याची निर्मिती करून गावागावात जलसंधारणाचे, पर्यावरण बचतीचे काम त्यांनी हाती घेतले. यात त्यांनी व्यक्तिमत्व विकासावर पाच पाटील यांची नेमणूक जो पाच गावांची जबाबदारी घेऊन गावात जलसंधारणाचे काम घडवणारे त्यांना पाच पाटील ही पदवी बहाल केली पाच पाटील प्रत्येक गावात जाऊन जलसंधारणाचे काम करू लागली
डॉ उज्वल कुमार चव्हाण 

रात्री ग्राम सभा घेताना डॉ उज्वल कुमार चव्हाण 

पर्यंत मिशन 500 कोटीचे काम आठ जिल्ह्यात 78 गावांमध्ये पोहोचले आहे यात एकूण 2300 शेतकरी लाभार्थी झाले आहेत.. डिझेल टाका मशीन वापरा या साध्या व सोप्या उत्ती नुसार गावात जलक्रांती ही घडून आणली यात विविध क्षेत्रातील लोक पुढे येऊन गाव आपले पाणीदार करत आहेत. पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी प्रश्न हा गाव पातळीवर मुक्त होत आहे एका अर्थाने गाव हे पाण्यासाठी स्वयंपूर्ण होत आहे ज्या गावात खरीप हंगामात येत होता त्या त्या गावात रब्बी हंगाम देखील शेतकरी घेऊ लागला आहे यातून शेतकऱ्यांचे स्थलांतर हे थांबले आहे भू वर्गातील पातळी वाढली आहे व जैव विविध संस्थांमध्ये देखील बदल झाला आहे. तसेच  यांचा सकारात्मक परिणाम गावागावात समविचारी गट तयार होऊन गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच उमदा नेतृत्व तरुणाचे तयार होत आहे ते गाव कल्याणासाठी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटत पाहायला मिळते. या ते जलसंधारणा बरोबरच मनसंधारणाचे देखील काम मिशन 500 कोटी लिटर साठा मार्फत हे होत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या  मुख्यालयात संयुक्त राष्ट्र जल परिषदेचे या वर्षी आयोजन केले यात मिशनचे पाच पाटील श्रीकांत जी पाय गव्हाणे हे उपस्थित होते.. यात त्यांनी 193 देशांसमोर जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले.



तर चला सर्वांनी आज जागतिक जलसंधारण दिनी संकल्प करूया...


 मिशन 500 कोटी लिटर जलसाठा मध्ये सामील होऊया...


जल है तो कल है.


पाणी आडवा पाणी जिरवा 🚩

 प्रा किरण मुरलीधर पाटील

 

 पाच पाटील

 मिशन 500 कोटी लिटर जलसाठा

शेतकरी स्वतः उभा राहून गाळ काढतांना 


 

Comments

Popular posts from this blog

या वर्षी इतक्या दिवस मिळणार शाळेला दिवाळी सुट्या ?