शेतकरी पुत्र आमदार मंगेश चव्हाण यांनी विज कोसळलीं न्हावे गावाला दिली भेट..
काल दि 9/9/2022 रोजी न्हावे येथील शेतकरी आबा शिवाजी चव्हाण हे सकाळी शेतात गेले.आपल्या कुटुंबासह शेतात काम करत असताना दुपारी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात आबा चव्हाण यांच्यासह त्यांचा अल्पवयीन मुलगा विकी आबा चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला.अतिशय दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती प्राप्त होताच तात्काळ घटनास्थळी जाऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी पाहणी केली व दुःखाचा डोंगर कोसळलेल्या चव्हाण परिवाराचे व न्हावे ग्रामस्थांचे सांत्वन केले. सदर परिवारावर आलेले संकट हे कुठल्याही आर्थिक मदतीने किंवा सांत्वनाने भरून निघणार नाही इतके मोठे आहे मात्र अश्या काळात आपण सर्वांनी या कुटुंबाच्या पाठीशी राहू त्यांना आधार दिला. सदर कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या.यानिमित्ताने सर्व चाळीसगाव वासीयांना विनंती केली निसर्गचक्र खूप बदलत असून कधी आणि किती मोठा पाऊस पडेल, वादळ येईल याची अनिश्चितता झाली आहे. पुढील ४ दिवस उत्तर महाराष्ट्रात मुसळदार पावसाचा अंदाज असल्याने आपण सर्वानी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे त्यांनी आव्हान केले.
- आमदार मंगेश रमेश चव्हाण
.jpeg)
Comments
Post a Comment