सुवर्णसंधी शेतकऱ्यांच्या शेतातळी साठी 👍
शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, दि. 7 - शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळ्याचे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना तसेच सामूहिक शेततळ्यासाठी असलेल्या योजनांचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर सिंचन सुविधा घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
***

Comments
Post a Comment