खुश खबर पी एच. डी विद्या वेतन मध्ये वाढ
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 'पीएच.डी.' उमेदवारांना आता नोंदणी दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी ३१ हजार रुपये, घरभाडे, आकस्मिक खर्च दिला जाणार आहे. तर 'यूपीएससी'ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे मासिक विद्यावेतन दहा हजारांवरून तेरा हजार करण्यात आले आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ नागपूर येथे ‘महाज्योती'च्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यात आला. वित्त विभागाकडे यासंदर्भात अधिक निधीची मागणी करण्याचे संकेत यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले..

Comments
Post a Comment