राज्यात लवकरच होणार पोलीस मोठी भरती गृह मंत्रालयाचा 👍
गृहमंत्रालयाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. 8 हजार पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून लवकरच आणखी 12 हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील लाखो तरुणी,तरुण पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहे . काही दिवसांपूर्वी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना नांदेड येथे तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. सरकारने तातडीने रिक्त पदांची भरती करावी, आता अखेर सरकारने या भरती प्रक्रियेबाबत मोठी घोषणा केली आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment