वीर भगतसिंग परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी इंजि भूषण सूर्यवंशी यांची निवड
गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.भुषण सुर्यवंशी सरांची कार्याध्यक्ष पदी निवड
मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेच्या प्रदेश कार्यकारणीत राज्यस्तरीय युवाशक्ती पुरस्कार प्राप्त असलेले इंजि.शिवश्री भुषण सुर्यवंशी "यांना राज्यात नाशिक विभागात जळगाव,धुळे,नंदुरबार,नाशिक व नगर जिल्ह्यात मोठी जबाबदारी ; थेट उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवडप रीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.सुदर्शन तारख आहेत.तर महाराष्ट्र प्रवक्ते सह प्रभारी पंकज रणदिवे यांच्या हस्ते ही निवड झाली.मागील दोन वर्षांपूर्वी सुर्यवंशी यांना सचिव पदाचा पदभार देण्यात आला होता.या काळात जळगाव जिल्ह्यात संघटना बळकट केली. तसेच नवीन कार्यकारिणी नेमून कामाला गती दिली.गरजु मुलांना सवलतीच्या दरात अभ्यासिका व पुस्तके मिळवुन दिले.तसेच कोरोना काळात पदवीच्या अंतिम वर्षाला सरसकट पासची मागणी केली,जिल्हाबंदीत अडकलेल्या विद्यार्थींना मदत कक्ष,व खोली भाडे व परीक्षा शुल्क माफीसाठी निवेदने दिली.असे विविध आंदोलने, मेळावे,मोर्चे या द्वारे स्पर्धा परीक्षा चळवळीतील परीक्षार्थी,युवक,विद्यार्थी शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न वरीष्ठ पातळीवर मांडून त्यांची तड लावली. शहरात VBVP मार्फत नवरात्र उत्सवात उत्कृष्ठ सजावट स्पर्धा व रक्तदान शिबीर आयोजित केले.विद्यापिठात सिनेट निवडणुकांमध्येही त्यांनी प्रचारात हिरीरीने भाग घेतला.त्यांच्या या सर्व कार्याने प्रभावित होऊन त्यांचे नाव निश्चित केले.निवड झाल्यावर भुषण सुर्यवंशी यांनी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. लेखक,व्याख्याते,प्रभारी शिवश्री पंकज रणदिवेयांचे धन्यवाद केले.सहकारी संघटक समीर लेनगुळे,नव निर्वाचित विभाग अध्यक्ष गजानन भदाणे,जिल्हाध्यक्ष प्रल्हाद वाघ,चाळीसगाव ता.उपाध्यक्ष राम दराखा यांना शुभेच्छा दिल्या.येणाऱ्या काळात शिव,शाहु,फुले,आंबेडकर,व भगतसिंग यांच्या आदर्श विचाराने चालणाऱ्या परिषदेचे कार्य बळकट करून त्याचे गतवैभव मिळून देण्यासाठी मेहनत करणार असल्याचे ग्वाही दिली.
.jpeg)
Comments
Post a Comment