MSF अंतिम यादी व निवड झालेल्या उमेदवारांसाठी


महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुरक्षा रक्षक (कंत्राटी) अंतिम निवड व प्रतिक्षाधीन यादी (नामिका सूची) 2020 :

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा मार्फत 7000 पुरुष सुरक्षा रक्षकांची (कंत्राटी) प्रतीक्षाधीन यादी 2020 च्या जाहिरातीनुसार दि. 20/08/2022 ते दि. 05/09/2022 दरम्यान रारापोबल गट क्र. 1, 3, 4, 5, 7, 9, 11 व 14 या भरती केंद्रावरती भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

सदर भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांना भरती प्रक्रियेतील निकष चाचणीनुसार मिळालेल्या गुणांची एकत्रित माहीती ही यापूर्वी उपलब्धतेनुसार मरासुम च्या संकेत स्थळावरती प्रसिध्द करण्यात आली होती. नमुद भरती प्रक्रिया कार्यपध्दतीतील निदेशानुसार फेर पडताळणी करुन तसेच प्राप्त झालेले आक्षेप, हरकतीची पुर्तता करुन महामंडळाच्या निवड समितीच्या मान्यतेने अंतीम गुणवत्ता निवड यादी व प्रतिक्षाधीन (नामिका सुची यादी) खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतिम गुणवत्ता यादी व प्रतिक्षाधीन (नामिका सुची) यादीतील उमेदवारांनी जाहिराती मधील महत्वाच्या सुचना व अटींच्या अनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे तसेच कोणती वस्तुस्थिती निदर्शक माहीती दडवून ठेवल्याचे अथवा खोटी माहीती दिल्यास उमेदवारांची झालेली निवड रद्द करुन कायदेशिर कारवाई करण्यात येईल, त्याबाबत उमेदवराच कोणताही दावा / तक्रार/ हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अंतिम निवड यादीतील निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे संबंधीत

विभागाकडून पडताळणीच्या अधिन राहून करण्यात येत आहे. अंतिम निवड यादीतील निवड झालेले उमेदवार पुढील

टप्यावर अगर कोणत्याही कारणास्तव अपात्र झाल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास प्रतिक्षाधीन (नामिका सुची) यादीतील उमेदवारांची निवड प्रसिध्द केलेल्या पुढील अनुक्रमांका नुसार करण्यात येईल. सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यक ते बदल /निर्णय घेण्याचा अधिकार हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहेत.

Comments

Popular posts from this blog

मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ची जलसंधारणासाठी एक जलनीती 👍

या वर्षी इतक्या दिवस मिळणार शाळेला दिवाळी सुट्या ?