Posts

Showing posts from October, 2022

तळेगाव येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न

Image
  चाळीसगाव : दिनांक 27 oct रोजी रा शि प्र मं लि संचालित शाखा माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा सह स्नेह मेळावा ( 2003 ची बॅच ) मोठया उत्साहात संपला झाला. 13 वर्षातून सर्व एकत्र आले यावेळी शिक्षकांना आदर सत्कार करून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूषवण्यात आले माजी मुख्याध्यापक एन जी शेलार, शिक्षक एन वी देशमुखस,पी बी गायकवाड,ए डि सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी होते.हे उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले प्रास्ताविक अश्विन देवरे यानी केले मनोगत अमित पालवे, माया आहिरे, संदीप गोसावी, नीता पाटील, सोनाली देशमुख यांनी केले माजी विद्यार्थी हे, जळगांव, नाशिक,पुणे, मुंबई,गुजरात, मध्यप्रदेश येथून आलेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी त्यांचा वैयक्तिक परिचय करून दिला..अनेक जण या प्रसंगी भावनिक झाले.शिक्षकांप्रती सगळ्यांनी  आदर व्यक्त केला आपण आपल्या शाळेमुळे एक समाजात एक जबाबदारी नागरिक झालो आहोत हे प्रत्येकाला जाणवले व त्यामुळे सगळ्यांनी शाळेला दोन सिलिंग फॅन,  चार्जिंग स्पीकर व माईक ...

पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी

Image
पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन लिंक नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2022 ला 3 वर्ष झालेले सर्व पदवीधर यांना पदवीधर मतदार यादी साठी ऑनलाईन अर्ज करून नाव नोंदणी करता येईल 👇👇👇👇👇👇  https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/

रील बनवा बक्षीस मिळवा अनोखी स्पर्धा

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रिल्स स्पर्धा १ नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भव्य रिल्स स्पर्धा आयोजित करत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती देशभरातील मराठी भाषिक रिल्स निर्मात्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचे नियम, अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. १) सर्व भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. २) तयार केलेला व्हिडीओ मराठी भाषेत असावा. ३) व्हिडीओमध्ये पुढील विषय असावेत- चमत्कार विरोधी प्रबोधन, बुवाबाजीबाबत जनजागृती, फलज्योतिषविरोधी जनजागृती, फटाकेमुक्त दिवाळी, छद्मविज्ञान, ग्रहणविषयक अंधश्रद्धांबाबत जनजागृती ४) व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील काही भाग घेऊ नये. तसेच copyright कायद्याचे पालन करावे.  ५) व्हिडीओ ३० ते ५० सेकंदांचा असावा. ६) व्हिडीओ ओरिएंटेशन portrait असावे.  ७) स्पर्धेसाठी आलेल्या सर्व व्हिडीओंच्या प्रकाशन व प्रसारणाचे  हक्क महाराष्ट्र अंधश्रद्ध...

वनरक्षक भरती लवकरच सुरू होणार

Image
 महाराष्ट्र शासन विभाग वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे यांचे कार्यालय. विषय :- अनुसूचित क्षेत्रातील (PESA) वनरक्षक, सर्वेक्षक व वननिरिक्षक यांचे भरतीबाबत. संदर्भ :- १) शासन अधिसूचना क्र. RB/TC/- 13016(1) (2019)/ SchArea recruitments/156 दिनांक २९-८-२०१९ २) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग) म. रा. नागपूर यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१० (२)/आस्था एक/प्र.क्र.४७/२१-२२/२३० दिनांक २४-११-२०२१ (३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक कक्ष-१/आस्था/ १२०/१९-२०७६५ दिनांक १५-१२-२०२१ ४) या कार्यालयाचे पत्र क्रमांक कक्ष-१/आस्था/ १२०/१९-२०/५९ दिनांक २७-४-२०२२ उपरोक्त संदर्भीय क्रमांक १ थे अधिसूचनेनुसार संदर्भीय क्रमांक २ चे पत्रान्वये वनविभागातील वनरक्षक, क्ष व वननिरिक्षक भरती खालील प्रमाणे करणेबाबत सूचीत केले आहे. १) अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के पेक्षा जास्त असेल, तेथील १०० टक्के पदे हि स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांमधून भरावयाची आहेत. २) अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात आदिवासीची लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या २५ ते ५० टक्के दरम्यान अ...

या वर्षी इतक्या दिवस मिळणार शाळेला दिवाळी सुट्या ?

Image
शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत. सध्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू शिक्षण विभागाने काढलेल्या आहेत. आदेशानुसार, येत्या २० ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्या लागणार आहेत. ही सुटी ७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यातच ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे. त्यामुळे त्यादिवशीही सुटी आहे. परिणामी, ९ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार आहेत. परिणामी, शाळांना तब्बल १८ दिवस सुटी मिळणार आहे.

विद्यार्थी ना प्रिय मुख्याध्यापक स्वप्निल निकम यांनी जि प शाळेत1200 वह्या चे केले वाटप

Image
 ७५व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्य महोत्सव निमित्त विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक स्वप्निल निकम१२०० यांनी वह्यांचे जि. प. शाळेत विद्यार्थ्याना वह्या वाटप. तांदूळवाडी, ता भडगाव आपल्या देशाला ७५ वर्ष स्वातंत्र्याचे पुर्ण होत आहे त्यानिमित्त आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांचा माध्यामतून साजरा करत आहोत मुख्याध्यापक स्वप्निल निकम यांनी विद्यार्थ्यांना मानसिक व बौद्धिक विकास व्हावा व त्यातून पुढील पिढी ही सक्षम घडवावी यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात शाळेला सुरुवात होत असताना स्वप्नील निकम यांनी तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक, उमरखेड, हिंगोने या गावांतील जिल्हा परिषद शाळा व तांदुळवाडी येथील इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या या प्रमाणे १२०० वह्या चे वाटप स्वप्नील निकम यांनी त्या शाळेत जाऊन शाळेचे मुख्याध्यापक, गावाचे सरपंच, शालेय समिती अध्यक्ष, सदस्य यांच्या हस्ते मुलांना वह्या चे वाटप केले त्याप्रसंगी मळगावचे सरपंच गुलाबराव वाघ, मुख्याध्यापक राजेंद्र वाणी सर, तांदुळवाडीचे सरपंच सीताराम पवार, मुख्याध्यापक बोरसे सर, चव्हान सर, भोरटेकचे उपसर...

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पदवी प्रमाणपत्र

Image
  कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यार्थी चे पदवी प्रमाणपत्र साठी ऑनलाईन अर्ज करू शकता  लिंक 👇👇 https://apps.nmu.ac.in/convocation/instructions.aspx

दिवाळीपूर्व शिक्षकांना मिळणार वेतन 👍

Image
यावर्षी दिवाळी 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2022 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असल्यामुळे सर्वाना खरेदी साठी शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक चनचन भासू नये म्हणून शिक्षक संघटनांनी या महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतरांचे, तसेच इतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. यासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासाठीची मागणी केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हे वेतन २१ ऑक्टोबरपूर्वीच देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच दराडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाढ झालेला महागाई भत्ता हा दिवाळीपूर्वी देण्यात यावा, अनेक वर्ष राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांचे दिवाळीचे बंद केलेले सानुग्रह अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागण्यांबाबत चर्चा केली असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मुंबई महापालिक...