दिवाळीपूर्व शिक्षकांना मिळणार वेतन 👍
यावर्षी दिवाळी 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2022 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असल्यामुळे सर्वाना खरेदी साठी शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक चनचन भासू नये म्हणून शिक्षक संघटनांनी या महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतरांचे, तसेच इतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. यासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासाठीची मागणी केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हे वेतन २१ ऑक्टोबरपूर्वीच देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच दराडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाढ झालेला महागाई भत्ता हा दिवाळीपूर्वी देण्यात यावा, अनेक वर्ष राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांचे दिवाळीचे बंद केलेले सानुग्रह अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागण्यांबाबत चर्चा केली असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठीही या वेळी निवेदन देण्यात आले. या वेळी शिक्षक परिषदेचे बाबा कदम, आनंद पवार आदी उपस्थित होते.
या सर्वांनी मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले..
.jpeg)
Comments
Post a Comment