वनरक्षक भरती लवकरच सुरू होणार
महाराष्ट्र शासन विभाग
वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे यांचे कार्यालय.
विषय :- अनुसूचित क्षेत्रातील (PESA) वनरक्षक, सर्वेक्षक व वननिरिक्षक यांचे भरतीबाबत. संदर्भ :- १) शासन अधिसूचना क्र. RB/TC/- 13016(1) (2019)/ SchArea recruitments/156 दिनांक २९-८-२०१९
२) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन- दुय्यम संवर्ग) म. रा. नागपूर यांचेकडील पत्र क्रमांक
कक्ष-१० (२)/आस्था एक/प्र.क्र.४७/२१-२२/२३० दिनांक २४-११-२०२१
(३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक कक्ष-१/आस्था/ १२०/१९-२०७६५ दिनांक १५-१२-२०२१
४) या कार्यालयाचे पत्र क्रमांक कक्ष-१/आस्था/ १२०/१९-२०/५९ दिनांक २७-४-२०२२
उपरोक्त संदर्भीय क्रमांक १ थे अधिसूचनेनुसार संदर्भीय क्रमांक २ चे पत्रान्वये वनविभागातील वनरक्षक, क्ष व वननिरिक्षक भरती खालील प्रमाणे करणेबाबत सूचीत केले आहे.
१) अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के पेक्षा जास्त असेल, तेथील १०० टक्के पदे हि स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांमधून भरावयाची आहेत. २) अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात आदिवासीची लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या २५ ते ५० टक्के दरम्यान असेल, तेथील ५० टक्के पदे हि स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांमधून भरावयाची
आहेत.
३) अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या हि एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के पेक्षा कमी असेल, तेथील २५ टक्के पदे हि स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांमधून भरावयाची आहेत. वरील पदांची निश्चिती करणेकरीता सोबतचे प्रपत्रामध्ये माहिती या कार्यालयास आवश्यक आहे. सदर माहिती सादर करतांना अनुसूचित क्षेत्राचीच माहिती सादर करणेकामी सूचीत केले आहे.
त्याअनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भीय क्रमांक ३ व ४ चे पत्रान्वये सदरची माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करणेकामी आपले कार्यालयास सूचीत करण्यात आले आहे. परंतु अद्याप पावेतो आपले कार्यालयाकडून सदरची माहिती प्राप्त झालेली नाही.
आता वनरक्षक संवर्गातील रिक्त पदे भरणेकामी केव्हाही भरती प्रक्रिया राबवावी लागू शकते, करिता सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत दिनांक १०-१०-२०२२ पावेतो न चुकता या कार्यालयास सादर करावी. आपले माहिती अभावी काही पेचप्रसंग उद्द्मल्यास त्यास आपले कार्यालय जबाबदार राहिल याची कृपया नोंद घ्यावी.
(दि.बा.पगार)
वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे
प्रति,
उपवनसंरक्षक, धुळे विभाग, धुळे नंदुरबार विभाग शहादा/ मेवासी विभाग, तळोदा प्रतिलिपी :- उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नाशिक विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांना संदर्भीय क्रमांक १ व २ चे पत्रासह माहिती व पुढील उचित कार्यवाहीसाठी अप्रेषित (२/- त्यांना सूचीत करण्यात येते की, संदर्भीय क्रमांक १ व २ चे पत्रात दिलेल्या निर्देशानुसार आपले विभ

Comments
Post a Comment