रील बनवा बक्षीस मिळवा अनोखी स्पर्धा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रिल्स स्पर्धा
१ नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भव्य रिल्स स्पर्धा आयोजित करत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती देशभरातील मराठी भाषिक रिल्स निर्मात्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचे नियम, अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
१) सर्व भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
२) तयार केलेला व्हिडीओ मराठी भाषेत असावा.
३) व्हिडीओमध्ये पुढील विषय असावेत- चमत्कार विरोधी प्रबोधन, बुवाबाजीबाबत जनजागृती, फलज्योतिषविरोधी जनजागृती, फटाकेमुक्त दिवाळी, छद्मविज्ञान, ग्रहणविषयक अंधश्रद्धांबाबत जनजागृती
४) व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील काही भाग घेऊ नये. तसेच copyright कायद्याचे पालन करावे.
५) व्हिडीओ ३० ते ५० सेकंदांचा असावा.
६) व्हिडीओ ओरिएंटेशन portrait असावे.
७) स्पर्धेसाठी आलेल्या सर्व व्हिडीओंच्या प्रकाशन व प्रसारणाचे हक्क महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असतील.
८) १ डिसेंबर २०२२ नंतर स्पर्धक आपले व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर प्रकाशित करू शकतील.
९) २८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आपले व्हिडिओ पाठवावेत.
१०) व्हिडिओसोबत स्पर्धेत सहभागी होण्याचा फॉर्म भरून पाठवावा. फॉर्मवरील सर्व रकाने भरून त्यावर सही करावी व फॉर्म स्कॅन करून पाठवावा. फॉर्मशिवाय आलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
११) १ नोव्हेंबर २०२२ रोजी स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल.
१२) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
१३) आपले व्हिडिओ socialmediaanis@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.
१४) सहभाग फॉर्म https://bit.do/anisreels या लिंकवर उपलब्ध आहे.
बक्षिसे- प्रथम क्रमांक- ७००० रु.
द्वितीय क्रमांक- ५००० रु.
तृतीय क्रमांक- ३००० रु.
दोन उत्तेजनार्थ बक्षिसे- प्रत्येकी २०००
टीप- या स्पर्धेबाबतचे अपडेट्स म.अं.नि.स.च्या फेसबुक पेजवर देण्यात येतील. त्यासाठी म.अंनिस चे फेसबुक पेज लाईक करावे. पेज लिंक- https://www.facebook.com/MaharashtraAns
अधिक माहितीसाठी संपर्क-
वाघेश साळुंखे ९९६०६०६०४४
राहुल माने ८२०८१६०१३२
.jpeg)
Comments
Post a Comment